पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात हा प्रवेश समारंभ होणार आहे. मागील महिन्यात पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्‍त केली होती. त्यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र तेव्हापासून पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा