पुणे : राज्यात पावसाला अनुकुल वातावरण असून सर्वदूर पाउस कोसळत आहे. कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात बहुतांश भागात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून उन पावसाचा खेळ सुरू आहे. रविवारी दि. 12 रोजी पुन्हा हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर शनिवारी दि. 11 रोजी पुणे शहरात दिवसभरात 12 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरात सर्वाधिक 90 मिमी पाउस झाला आहे. पौड, मुळशी आणि वेल्हे तालुक्यात 40, जुन्नर तळेगाव 20 तर भोर, वडगाव मावळ आणि आंबेगाव घोडेगाव तालुक्यात 10 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा