काबूल : अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने तिथे आर्थिक योजनांची घोषणा केली होती. यानंतर आता अफगाणिस्तानचे अनेक गोपनिय दस्तऐवज पाकिस्तानच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यापैकी कित्येक कागदपत्रे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. लोकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेल्या तीन सी170 विमानांतून ही कागदपत्रे पाकिस्तानला नेल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांसोबत काम करणार्‍या एका सूत्राच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने ही महत्त्वाची कागदपत्रे आपल्यासोबत नेली आहेत. यामध्ये एनडीएस क्लासिफाइड डॉक्युमेंट्स हार्ड डिस्क आणि इतर डिजिटल दस्तावेजांचा प्रामुख्याने समावेश आहे. आयएसआयने ही माहिती आपल्या फायद्यासाठी वापरल्यास अफगाणिस्तानला मोठा धोका उद्भवू शकतो. तसेच, यामुळे तालिबान सरकारदेखील पाकिस्तानच्या ताटाखालचे मांजर होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा