पुणे : माजी राज्यपाल महारष्ट्र के. शंकरनारायण यांच्या जीवनावर आधारित ‘अनुपम जिविदम’ या मल्याळम् भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन महिला बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
शहर काँग्रेसच्या पदाधिकारी शानी नौशाद आणि अब्दुल मजीद परिवारातर्फे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. रोहित टिळक, मॅथ्यू अँटोनीमी, कमल व्यवहारे, के. के. अब्दुल गफूर, शानी नौशाद, विना राज, नीता राजपूत, नुरूद्दीन सोमजी, नंबियार आदी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाल्या, के. शंकरनारायण यांनी महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले. ते राज्यपाल असताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. ते काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते होते. त्यांनी आपल्या ‘अनुपमम जिविदम’ या पुस्तकात जगलेले जीवन शब्दबद्ध केले आहे. काँग्रेसचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, तरी केंद्रातील सत्ताधारी ‘काँग्रेसने काय केले’ असा प्रश्‍न उपस्थित करत आहेत. मात्र काँग्रेसने देशासाठी काय केले हे जनतेला सांगायची गरज नाही. मल्याळी समाज सुशिक्षित आहे. त्यामुळे कोण देशाच्या विकासाठी काम केले हे त्यांना माहित आहे. हा समाज शांत आणि प्रगतशील असल्याचेही ठाकूर यांनी स्पष्ट केले. के. के. अब्दुल मजीद यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा