मँचेस्टर : भारत आणि इंग्लंडदरम्यानचा मँचेस्टरमधील पाचवा कसोटी सामना शुक्रवारी शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला. कोरोनाच्या शिरकावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) हा निर्णय घेतला.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, सहायक फिजिओ योगेश परमार, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यापाठोपाठ अन्य काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यांच्यासोबत योगेश परमार यांच्याबरोबर रोहित शर्मा, पुजारा, महमद शामी, इशांत शर्मा या भारतीय खेळाडूंनी सराव केला होता. त्यामुळे त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकार्‍यांनी पाचव्या आणि अखेरच्या कसोटीसंदर्भात सविस्तर चर्चा करून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, या भीतीने सामना रद्द केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा