काबूल : तालिबानला अफगाणिस्तानवर कब्जा करण्यास मदत केल्याबद्दल पाकिस्तानच्या विरोधात काबुल ते अमेरिकेपर्यंत निदर्शने होत आहेत. दरम्यान, तालिबानने काबूलमध्ये पाकिस्तानविरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याची बातमी आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद यांच्या काबूल भेटीमुळे अफगाणिस्तानमध्ये बाहेरील हस्तक्षेपामुळे लोक संतापले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काबुलमधील राष्ट्रपती भवनाजवळ मोठ्या संख्येने लोकांनी पाकिस्तान आणि आयएसआयच्या प्रमुखांच्या विरोधात निदर्शने केली. या दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या तालिबानने गोळीबार सुरू केला. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा