काबूल ः पंजशीर प्रांतावर ताबा मिळविण्यासाठी पाकिस्तानने तालिबानला मदत केल्याचे समोर आले आहे. पंजशीर खोर्‍यामध्ये पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनद्वारे हवाई हल्ला केला, अशी माहिती अफगाणिस्तानच्या सामंगन प्रांतातील माजी खासदार जिया अरियनजादो यांनी दिली.
नॉर्दन अलायन्सनेदेखील तालिबानला पाकिस्तानकडून मदत पुरवली जात असल्याचा खुलासा केला होता. यापूर्वी, नॉर्दन अलायन्सने युद्धबंदीचे आवाहन केले होते, पण तालिबानने ते नाकारले. तसेच, कोणताही मुद्दा चर्चा करून सोडविण्याची आपली इच्छा आहे, असेही तालिबानने म्हटले होते.
या हल्ल्याचा इराणने निषेध केला आहे. रविवारी रात्री झालेला हा हल्ला निंदनीय असल्याचे सांगत इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या हल्ल्यात प्राण गमवालेल्या अफगाण नेत्यांना श्रद्धांजली वाहिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा