कुरुंदवाड :
पूरग्रस्त शेतकर्‍यांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली. दरम्यान, राजू शेट्टी यांची सभा सुरु असताना एका कार्यकर्त्याने नृसिंहवाडी पुलावरुन पंचगंगा नदीत उडी मारली. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. रेस्क्यू फोर्सचे जवान आणि पोलिसांनी त्याला सुखरुप बाहेर काढले. राजू शेट्टी यांची नृसिंहवाडी सभा सुरु असताना पुलावरुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते दिनकर यादव यांनी पंचगंगा नदीत उडी मारली. रेस्क्यू फोर्सचे जवान आणि पोलिसांनी त्याला सुखरुप बाहेर काढले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा