मंचर, (प्रतिनिधी) : केंद्र सरकार माणसाला खायला देत नाही. ते या जनावरांना काय देणार. जनावरांची काळजी बैलगाडा मालक घेतो. बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
वडगांव काशिंबेग फाटा ता. आंबेगाव येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत बोलत होते. खासदार संजय राऊत म्हणाले बैलगाड्या संदर्भात आपण लढाई लढतोय. तिथे आपल्याला यश मिळतेय. पण येथे बैलगाडा शर्यती बंद असल्याने शेतक्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यांच्या जीवनातील आनंद हिरावून घेतला जात आहे. सरकार म्हणून काही गोष्टी पाळाव्या लागतात. कायद्याचे पालन करावे लागते. पक्ष म्हणुन आपण कायदेभंग चळवळी केल्या. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करु. पुढच्या वेळी मी जेव्हा येईल तेव्हा बैलगाडा विषय मार्गी लागलेला असेल. शिवसेना बैलगाडा मालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात म्हणुन गेल्या अनेक वर्षापासुन मी न्यायालयात लढाई लढत आहे. बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी मी स्वस्थ बसणार नाही. कर्नाटकात बैलगाडा शर्यतींना उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. परवानगी देताना 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या व जिंकलेल्या दाव्याचा संदर्भ माझे नाव कर्नाटक येथील न्यायालयाने तीन वेळा उच्चारले असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा