मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना साकडे

मुंबई, (प्रतिनिधी)ः विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्य मंत्रिमंडळाने ठराव पाठवून बराच कालावधी झाला आहे. त्यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली. राज्यपालांनी लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त कोट्यातील 12 जागांच्या नियुक्तीसाठी राज्य मंत्रिमंडळाने 12 नावांची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. मंत्रिमंडळाचा ठराव पाठवून आठ महिने उलटले आहेत. सरकारने दोन वेळा समरणपत्रही पाठवले आहे. परंतु, राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत एक अर्जही उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. न्यायालयाने थेट निर्देश दिले नसले, तरी अनिश्चित काळापर्यंत निर्णय प्रलंबित ठेवणे योग्य नसल्याचे मतप्रदर्शन केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री व मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा