औरंगाबाद : राज्यात काही दिवसांच्या उघडीपीनंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला असून औरंगाबादमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
दरड कोसळल्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलिसांकडून दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा