पाथरी : वाशिम येथील शिवसेनच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार गवळींच्या 5 संस्थांवर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत. याच प्रकरणात पाथरी येथे इडीच्या अधिकार्‍यांनी एकतानगर परिसरातील कंत्राटदार सईद खान यांच्या घरी छापा टाकला. इडीच्या पथकाने तीन तास घराची झाडाझडती घेतली. खासदार भावना गवळी यांच्याशी संदर्भात असलेल्या कामांमध्ये सईद खान यांची भागीदारी आहे अशी चर्चा आहे. या पथकाने एकतानगर भागातील 50 मीटरपर्यंतचा परिसर सील केला. स्थानिक पोलिसांनाही या ठिकाणी प्रवेश देण्यात आला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा