शहराध्यक्षपदी बागवे कायम
पुणे ः
प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी डॉ. रोहित टिळक आणि अभय छाजेड यांची नुकतीच निवड करण्यात आली; तर प्रदेश उपाध्यक्षपदी देविदास भन्साळी यांची निवड करण्यात आली. शहराध्यक्षपदी रमेश बागवे यांना कायम ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव के. सी. वेणूगोपाल यांनी ही नियुक्‍ती नुकतीच केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात शहराध्यक्ष बदलांच्या हालचालींना वेग आला होता. ब्लॉक अध्यक्षांपासून तर शहर पातळीवरील नेत्यांकडून याबाबत नावे मागविण्यात आली होती. शहर पातळीवरच एकमत होत नसल्याने अखेर बागवे यांनाच या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला. एप्रिल 2016 मध्ये शहराध्यक्षपदाची सूत्रे बागवे यांच्याकडे सोपविण्यात आली
होती.
प्रदेश उपाध्यक्षपदी देविदास भन्साळी
पुणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान, ज्येष्ठ नेते स्पष्टवक्‍ते देविदास भन्साळी यांची प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्‍तीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजामध्ये जेणेकरून एक चांगला संदेश गेला आहे की, काँग्रेसमध्ये निष्ठेला उशिरा का होईना पक्षश्रेष्ठांकडून संधी मिळते. मागील 45 वर्षांपासून कोणत्याही पदाची लालसा न ठेवता ते कार्यरत आहेत. सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात काँगे्रस संघटना बांधणीसाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा