मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद आणि जागतिक बाजारातील संमिश्र कलाचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर झाला. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 18 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 152 रुपयांनी घसरून 46,328 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. त्याचप्रमाणे चांदीच्या किंमतीत घट झाली. सराफा बाजारात चांदीची किंमत 286 रुपयांनी घसरून 62,131 रुपये प्रति किलो झाली. सोने आणि चांदीच्या सध्याच्या किमतींमुळे मागील ट्रेडिंग सत्रात उसळी दिसून आली होती. सोने प्रति दहा ग्रॅम 46,480 रुपयांच्या पातळीवर होते. त्याचवेळी, चांदीमध्ये 62,417 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेडिंग झाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा