नवी दिल्ली : रिझर्व बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. रेपो दर 4 टक्क्यांवर कायम असून रिव्हर्स रेपो दर 3.35 टक्क्यांवर कायम आहे. बुधवारी रिझर्व बँकेकडून नव्या आर्थिक वर्षातील पहिले पतधोरण जाहीर करण्यात आले. त्याआधी, पतधोरण समितीची बैठक पार पडली. रिझर्व बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी या निर्णयाची माहिती दिली. तसेच, आता आरटीजीएस आणि एनईएफटी द्वारे पैसे पाठविण्यासाठी ग्राहकांना बँकांची गरज लागणार नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा