मोदींचा ममतांवर पलटवार

कूचबिहार : पश्चिम बंगालची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मंगळवारी एका प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला होता. त्यानंतर कूचबिहार येथील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममतांवर पलटवार केला. ममतांनी सर्व मुस्लिमांना एक व्हायला सांगितले. मत विभागू देऊ नका म्हणाल्या. तुम्ही असे म्हणताय याचाच अर्थ मुस्लिम धर्मीयांची मतेही तुमच्या ताब्यातून सुटताहेत.

मोदी म्हणाले, ज्या मुस्लिम मतांना तुम्ही तुमची सर्वांत मोठी ताकद मानत होता तीदेखील तुमच्या हातून सुटली. मुस्लिमही तुमच्यापासून लांब गेले. तुम्हाला सार्वजनिक स्वरूपात असे सांगावे लागले यावरूनच कळते की तुम्ही ही लढाई हरला आहात. जर आम्ही असे म्हटलो असतो की सर्व हिंदू एकजूट व्हा. भाजपला मते द्या तर निवडणूक आयोगाकडून आम्हाला नोटिसा मिळाल्या असत्या. सर्व देशातील संपादकीय आमच्या विरोधात असते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा