एक दिवसात २६ हजारांवर चाचण्या

पुणे : शहरातील रिक्षाचालक, कॅबचालक, इ-कॉमर्स कंपन्याचे कर्मचारी, हॉटेलचे कर्मचारी तसेच पथारी व्यावसायिक, वृत्तपत्र विक्रेते यांना येत्या 10 तारखेपासून कोरोना लशीकरण केल्याचे प्रमाणपत्र अथवा करोना चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे, करोना चाचणी करण्यासाठी काल (बुधवारी) शहरातील खासगी चाचणी केंद्रांवर मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. बुधवारी एक दिवसांत एकूण 26 हजार 120 जणांनी आपली कोरोना चाचणी केली आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल येण्यास दोन दिवस लागत असल्याने तसेच शुक्रवार संध्याकाळपासून शहरात पूर्णत: संचारबंदी असल्याने अनेकांनी काल चाचणी करण्यावर भर दिला. महापालिकेकडून राज्यशासनाच्या आदेशाच्या धर्तीवर शहरातही दुकाने बंद ठेवण्याचे तसेच विकेंड लॉकडाऊनचे आदेश काढले आहेत. हे आदेश काढताना; रिक्षा, टॅक्सी, कॅब तसेच खासगी स्वयंचलित वाहन चालविताना प्रवाशी संख्येचे मर्यादा घालण्यात आली असून सार्वजनिक वाहन चालविणारे वाहनचालक तसेच इतर कर्मचार्‍यांनाही करोना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र अथवा चाचणीचा निगेटिव्ह अहवाल 15 दिवसांचे वैधता प्रमाणपत्र जवळ बाळगणे बंधनकारक आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा