पुणे : कोरोनामुळे शहरात कडक निर्बंध लागू आहेत. हे निर्बंध मागे घेऊन दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शहरातील व्यापार्‍यांनी शासन आणि प्रशासनाकडे केली होती. मात्र त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने शुक्रवारी शहरातील व्यापारी दुकाने उघडणार आहेत.
पुणे व्यापारी महामंडळाने दोन दिवसांपूर्वीच शुक्रवारी दुकाने उघडणार असल्याचा इशारा शासन आणि प्रशासनाला दिला होता. त्यानुसार व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यापार्‍यांना आज दुकाने उघडण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी महामंडळाच्या अंतर्गत शहरात सुमारे 80 ते 85 विविध व्यावसायिकांच्या संघटना आहेत. व्यावसायिकांची संख्या 35 हजारापेक्षा अधिक आहे. हे सर्व व्यापारी आज व्यापारी महामंडळाच्या आवाहानाला प्रतिसाद देत दुकाने उघडणार असल्याचे पुणे व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका व सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.
कडक निर्बंधाचा निषेध नोंदविण्यासाठी गुरूवारी पुणे व्यापारी महामंडळाच्या नेतृत्त्वाखाली व्यापार्‍यांनी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले. हेच व्यापारी आज शासन आणि प्रशासनाने लागू केलेले निर्बंधाविरोधात दुकाने उघडणार आहेत. पुणे व्यापारी महासंघाच्या अंतर्गत सराफ, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, होजिअरी, मेटल, भांडी, संगणक, टिंबर, स्टील, प्लायवूड, हार्डवेअर, टाईल्स, स्टेशनरी, केमिकल, घड्याळे, पेपर, ऑटो, मोबाईल, स्पेअरपार्ट, जुन्या गाड्या, खेळणी, चष्मे, पेंट, फर्निचर, वेल्डिंग, सायकल, अगरबत्ती, हॉटेल आदी संघटना कार्यरत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा