ममता बॅनर्जी यांचा आरोप

कोलकाता : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमधील निवडणूक सर्वाधिक चुरशीची आणि चर्चेतील ठरली आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दोन्हीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. एका प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका करताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षाही चुकीचे मार्ग अवलंबल्याचा आरोप केला.

ममता म्हणाल्या, केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये आपल्या लोकशाही अधिकारांचा गैरवापर करत आहे. ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, लोकांना मारहाण करत आहेत, त्यांची हत्या करत आहेत. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी पाहावे, अशी विनंती त्यांनी केली. गुंडांच्या आणि बंदुकांच्या जोरावर ते निवडणुका लढवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील असे काही केले नसेल, ते मोदी करत आहेत, हे दुर्दैवी आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा