हैदराबाद : क्रिकेट असोसिएशनने (एचसीए) यंदा आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयला प्रस्ताव दिला आहे. त्यांच्या मते, कोरोना विषाणूमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) जागा बदलण्याची इच्छा असेल, तर आम्ही राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन करण्यास सज्ज आहेत.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू महमद अझरुद्दीनने ट्विट केले, की अशा कठीण काळात आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आयपीएलचे आयोजन सुरळीत व्हावे यासाठी एचसीएने सामन्यांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीसीसीआयने हैदराबादला आयपीएल 2021 चे पर्यायी ठिकाण म्हणून ठेवले आहे. मात्र, बोर्डाकडून यासंबधी कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

कोरोना रुग्णसंख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंध जाहीर केले. या निर्बंधानंतर मुंबईतील आयपीएल सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आयपीएल सामने मुंबईतच खेळवणार असल्याचे स्पष्ट केले. आता महाराष्ट्र सरकारनेही आयपीएलला परवानगी दिली आहे.

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे.

देवदत्तपूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल कोरोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा आणि देवदत्त तिसरा खेळाडू आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला कोरोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. चेन्नई सुपर किंग्जच्या कंटेट टीमच्या सदस्यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा