साबरमती : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने येथे 25 दिवसांच्या दांडी यात्रेेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी, स्वातंत्र्यानंतरच्या 100 वर्षांनी म्हणजे 2047 मध्ये नवभारताचे निर्माण झालेले असेल. त्यासाठी रूपरेषाही तयार केली जाईल, असे मत व्यक्त केले.

नायडू म्हणाले, आजपर्यंतच्या काळात आपल्या देशाने अनेक गोष्टी साध्य केल्या आहेत. भारताचे सामर्थ्य जगाला माहिती असून आज सगळे जग भारताला मानत आहे. 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण झालेली असतील तेव्हा नवभारताची निर्मितीही झालेली असेल; पण त्यासाठी आपल्याला आतापासूनच पुढील पंचवीस वर्षांची रूपरेषा तयार करावी लागेल.

दरम्यान, यावेळी काढण्यात आलेल्या दांडी यात्रेत 81 जण सहभागी झाले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा