नवी दिल्ली : देशात कोरोना लशीकरण मोहीम जोरात सुरू आहे. लस घेतल्यानंतरही काहींना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने नियमात काही बदल केले आहेत. त्यानुसार, अशा रुग्णांची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम आरोग्य मंत्रालयाने हाती घेतले आहे. तसेच, फॉर्ममध्ये एक कॉलम वाढविण्यात आला आहे. जेणेकरुन बाधित रुग्णाने आधी लस घेतली होती का? हे स्पष्ट होणार आहे. शिवाय, लस किती दिवस आधी घेतली? कोव्हिशील्ड की कोव्हॅक्सिन कोणती लस घेतली होती, हेही जाणून घेतले जाणार आहे. या सर्वांचा नव्याने अभ्यास केला जाणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा