नवी दिल्ली : भारतात सट्टेबाजीला केंद्र सरकारने कायदेशीर परवानगी न देणेच हितकारक ठरेल. कारण सट्टेबाजीला चालना दिल्यास सामना निश्चितीचे प्रकार बळावतील, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख शबीर हुसैन शेखादम खांडवाला यांनी व्यक्त केले.

देशात सट्टेबाजीला कायदेशीर परवानगी दिल्यास सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल, असा दावा काही जणांकडून केला जात होता. परंतु त्याला विरोध करताना खांडवाला म्हणाले की सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता द्यावी की नाही, हा सरकारचा प्रश्न आहे. परंतु सट्टेबाजीमुळे सामना निश्चितीचे प्रकार बोकाळतात, हे एक पोलीस अधिकारी म्हणून मी सांगू इच्छितो. सध्या तरी सरकारने मान्यता न देऊन योग्यच भूमिका घेतली आहे. सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता दिल्याने खेळातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळेल, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी प्रमुख अजित सिंग यांनी म्हटले होते. केंद्रीय मंत्री आणि ‘बीसीसीआय’चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीसुद्धा सट्टेबाजीला मान्यता द्यावी, अशी सूचना केली होती. मुंबईतील ‘आयपीएल’ सामन्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे, असे राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा