पुणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नव्या निर्बंधानुसार सायंकाळी 6 वाजता खाणावळी बंद करण्यात येत आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, एकटे राहणारे नोकरदर यांना सहाच्या आधीच जेवण पार्सल घेण्याची व्यवस्था करावी लागत आहे. रात्रीच्या खाणावळी बंद आहेत. तर रेस्टॉरंट सुरु असून एकावेळी 200 रुपये खर्च करण्याची ऐपत आमची नाही. त्यामुळे खाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

शहरात विद्यार्थी व नोकरी करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येत्या रविवारी एमपीएसीची परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी पुण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जेवणाचे हाल होत आहेत. अनेक खाणावळी विद्यार्थी बंद असल्याने बंद केले आहेत. त्यामुळे मोठ्या हॉटेलमध्ये थाळीचे जेवण देत नसल्याने 200 रुपयांचे वर ऑर्डर द्यावी लागते. विद्यार्थ्यांना एका वेळचे जेवणाचे दर परवडत नाही. परीक्षाला सामोरे जायचे, अभ्यास करायचा, त्याबरोबर जेवणासाठीही संघर्ष करायचा, असा सवाल यावेळी नामदेव म्हेत्रे यांनी केला. तो म्हणाला माझी येत्या रविवारी परीक्षा असल्याने मी पुण्यात थांबलो. मात्र येथे खाणावळी सुरु नाहीत. मोठे रेस्टॉरंट सुरु आहेत. मात्र त्यांचे दर आम्हला परवडणारे नाहीत. उपाशी राहून अभ्यास करु शकत नाही. करिअरचा मोठ्या प्रश्नाबरोबर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी त्याने सांगितले.

सकाळची जेवणाची व्यवस्था होते. तर रात्री उपाशी राहावे लागते, अशी वेळ कोणावरही येऊ नये असे मनोज वारे याने सांगितले. विद्यार्थी नसल्याने अनेकांनी खानावळी बंद केल्या आहेत. सकाळी जेवणाची व्यवस्था होते. तर संध्याचा डब्बा घेण्यासाठी चार वाजताच रांगेला उभे राहावे लागते. खाणावळीसाठी किमान रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा