पुणे : पुण्यात सलग दुसर्‍या दिवशी बुधवारी पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर 54 जणांचा मृत्यू झाला असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दिवसभरात 5 हजार 651 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 361 कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू झालेले 13 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 46 हजार 71 झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 26 हजार 120 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 5 हजार 651 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या शहरात 4 हजार 352 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर गंभीर रुग्णांची संख्या 957 असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 16 लाख 19 हजार 856 हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 3 लाख 5 हजार 372 जण कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी 2 लाख 53 हजार 734 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 5 हजार 567 झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा