नवी दिल्ली : देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे ही ते म्हणाले आहेत.हर्षवर्धन यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते.

हर्षवर्धन यांनी यावेळी देशात परिस्थिती नियंत्रणात असून बऱ्याच त्रुटी दाखवून दिल्या. यावेळी त्यांनी बेजबाबदार वर्तन आणि निष्काळजीपण कोरोनाचा कहर वाढण्याचे कारण असल्याचे अधोरेखित केले. हर्षवर्धन यांनी यावेळी कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशाचा रिकव्हरी रेट ९२.३८ असून मृत्यूदर १.३० टक्के असल्याची माहिती दिली.

“गेल्या दोन महिन्यात देशातील कोरोना रुग्णसंख्या अचानक वाढली आहे. सक्रिय रुग्संख्या कमी असून रिकव्हरी रेट ९२.३८ आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी देशातील मृत्यूदर १.३० टक्के आहे,” अशी माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा