मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशीचे आदेश नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या आदेशाला महाराष्ट्र सरकार आणि स्वतः अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

दरम्यान, सदर प्रकरणाच्या सुनावणीवेळी आपलेही म्हणणे ऐकून घ्यावे, असे सांगणारे कॅव्हेट देशमुख यांच्यांवर गंभीर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह, तसेच वकील जयश्री पाटील यांनी दाखल केले आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, 15 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते.

यानंतर देशमुख यांनी तातडीने गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच, तातडीने दिल्ली गाठली आणि काँग्रेस नेते आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांची भेट घेतली. त्याचवेळी देशमुख मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशास आव्हान देणार हे स्पष्ट झाले होते. देशमुख यांनी काल उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. तर, राज्य सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत देशमुख यांच्याविरोधातील चौकशीचा आदेश रद्दबातल करावा, असा अर्ज दाखल केला. दुसरीकडे, पाटील यांनी आपलेही म्हणणे ऐकून घेतले जावे, असे सांगत कॅव्हेट दाखल केले. परमबीरसिंह यांनीही आपले म्हणणे ऐकून घ्यावे, असे सर्वोच्च न्यायालयासमोर सांगितले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा