४७ जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांच्या वाढीबरोबर मृत्यूचे सातत्य कायम आहे. मंगळवारी दिवसभरात 5 हजार 600 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ४८१ कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोविस तासात ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ९ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार 822 झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

काल दिवसभरात स्वॅब व अँटिजेन चाचणीसाठी 17 हजार 389 संशयितांचे नमुने घेण्यात आले. यातील 5 हजार 600 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या शहरात 4 हजार 99 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. तर गंभीर रुग्णांची संख्या 915 असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 15 लाख 93 हजार 736 हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी 2 लाख 99 हजार 721 जण कोरोनाबाधित आढळून आले. यापैकी 2 लाख 49 हजार 373 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 5 हजार 526 झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा