पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या 10 दिवसांपासून शहरात दिड हजारच्या पुढे वाढणारी रूग्ण संख्या आता तीन हजाराच्या जवळ गेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असून मंगळवारी शहरात 2 हजार 904 तर हद्दीबाहेरील 34 असे 2938 नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एकाच दिवशी 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 679 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरात 1 लाख 55 हजार 984 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 1 लाख 30 हजार 129 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत हद्दीतील 2 हजार 94 तर हद्दीबाहेरील 850 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मंगळवारी 6 हजार 514 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. 2 हजार 913 जणांचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला. 1 हजार 752 जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. 1 हजार 425 घरांना भेटी देऊन 4 हजार 648 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 285 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 2 हजार 345 करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा