पुणे : शहरातील सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला आहे. यामधून जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना वगळण्यात आले आहे. मंगळवारी हे आदेश महापालिका आयुक्तांकडून काढण्यात आले असून यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना सोमवार ते शुक्रवार परवानगी असणार आहे. काही सेवांच्या अत्याश्यक सेवेत समावेश करण्यात आला असून त्यांना वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना 1 हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.

जीवनावश्यकमध्ये पुढील सेवा

पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
कार्गो आणि कुरीअर सेवा
डेटा सेंटर, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित सेवा
शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा
फळ विक्रेते
मटण, चिकन, अंडी मासे विक्रीची दुकाने
पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र
पाळीव प्राणी खाद्याची दुकाने
खासगी कार्यालये आठवड्याचे सर्व दिवस 7 ते 6 वाजेपर्यंत खूली राहतील
सेवी तसेच सेबीची कार्यालये
रिझर्व बँकेच्या संबंधित संध्या
सर्व नॉनबँकिंग वितीय महामंडळे
सर्व मायक्रो फायनान्स संस्था
लस, औषधे, वाहतूक करनारे परवाना धारक संस्था

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा