रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांना आवाहन
पुणे : दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ज्या विशेष रेल्वे गाड्या सुरू आहेत. त्यात केवळ तिकीट आरक्षित असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात आहे. तिकीट प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट लक्षात घेऊन प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे बुधवारी करण्यात आले.
पुणे रेल्वे मंडळ रेल्वे स्थानक, गाड्यांमध्ये कोरोना संबंधित शिष्टचार व उपाययोजनांची पूर्ण अंमलबजावणी करीत आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी तिकीट आरक्षित असलेल्याच प्रवाशांना रेल्वे गाडीत प्रवेश दिला जात आहे. रेल्वेचे जनरल तिकीटही कोरोनामुळे बंद आहे. त्यामुळे तिकीट आरक्षित झालेल्या प्रवाशांनीच गाडी सुटण्याच्या 90 मिनीटे आधी रेल्वे स्थानकावर पोहचावे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरही एकाच वेळी अधिकची गर्दी होणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने नमुद केले आहे.
रेल्वे फलाटावर सामाजिक अंतर पाळल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येईल. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षणे असल्यास प्रवाशांनी प्रवास करणे टाळावे. प्रवाशांनी स्थानकावर आणि प्रवासा दरम्यान मास्कचा वापर करावा. हॅडवॉशने हात धुवावेत. सॅनिटायझरचा वापर करावा. प्रवाशांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे, असे आवाहनही रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा