नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना विशेष सल्ला दिला आहे. त्यानुसार, 45 वर्षांचे अथवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या सर्व सरकारी कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली, पाहिजे असा सल्ला दिला आहे.

जेणेकरून, कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकेल, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सुरक्षित अंतर राखणे या कोरोना नियमावलीचे पालन केले पाहिजे, असेही केंद्र सरकारने सांगितले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा