पुणे : अत्यावश्यक सेवेत काम करणारे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांतील शासकीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी, शासकीय व खाजगी हॉस्पिटल, तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणारे शासकीय कर्मचारी यांच्यासाठी बुधवारपासून सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत अत्यावश्यक बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार 20 मार्गांवर 41 बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकार्‍यांसाठी खालील 20 मार्गावर बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. बस आणि कंसात बसचा मार्ग क्रमांक दिला आहे. नांदेडसिटी ते डेक्कन (104), आय. ए.टी. (खडकवासला) ते पुणे स्टेशन (49),औंध ते डेक्कन (354),विमाननगर ते मनपा (166), विश्रांतवाडी ते मनपा (152), सांगवी ते पुणे स्टेशन (204), चिंचवड गांव ते पुणे स्टेशन (204 ), मनपा ते वाघोली (159), मनपा ते लोहगांव (155), मनपा ते कोंढवा हॉस्पिटल (170), मनपा ते वडगांवशेरी (165), वारजे माळवाडी ते पुणे स्टेशन (144), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (94), वारजे माळवाडी ते मनपा (144), कात्रज ते कात्रज (2), कात्रज ते पुणे स्टेशन (24), भेकराईनगर ते मनपा (111), सासवड ते पुणे स्टेशन (207 अ), तळेगांव ते मनपा (305), राजगुरूनगर ते मनपा (358).

वरील मार्गावरील बसेस सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत प्रत्येक 60 मिनिटांनी एक याप्रमाणे सोडण्यात येणार आहेत. पीएमपी बसमधून प्रवास करणार्‍या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहणार आहे. ओळखपत्र पाहूनच कर्मचार्‍यांना बसमध्ये प्रवेश देण्यात येईल. यासह प्रचलित तिकीट दराप्रमाणे दर आकारणी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा