फाम संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
पुणे : अत्यावश्यक सेवा वगळून शहरातील सर्व व्यावसायिकांचे दुकाने बंद करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सकडून शहरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती फामचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली.
व्यवसाय, दुकाने बंद करण्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. टाळेबंदीत व्यापारी संकटात आले. व्यापार थोडा पूर्वपदावर आला असताना पुन्हा शहरातील सर्व व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. व्यापार जरी बंद ठेवला तरी व्यापार्‍यांना कर भरावे लागतात. कामगारांना वेतन द्यावे लागते. दुकान भाडे द्यावे लागते. मात्र, करात सरकार व्यापार्‍यांना कोणतीही सूट देत नाही, याकडे संचेती यांनी लक्ष वेधले.
व्यवसाय, व्यापार बंद झाल्यास व्यापार्‍यांसह कामगार त्यांच्या कुटुंबीयांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. व्यापार्‍यांना नियमावली द्यावी. प्रशासनाच्या आदेशानुसार व्यापारी नियमावलीचे पालन करतील. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, असे संचेती यांनी निवेदनात म्हटले आहे.


व्यवहार सुरूच ठेवा
कडक निर्बंधांसह व कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फाम) तर्फे संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदन दिले आहे. कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आपल्याकडे दोन लसी आहेत. लसीकरण चालू आहे. तपासण्या होत आहेत, डॉक्टरांकडे उपचाराचे कौशल्य आहे. म्हणून लॉकडाऊनऐवजी, 50 टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सर्व व्यवहार मर्यादित वेळेसाठी चालू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही शहा यांनी निवेदनात नमूद केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा