मुंबई : एकीकडे आयपीएल तोंडावर आलेली असताना राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, त्यामुळे आयपीएलच्या मुंबईतल्या सामन्यांवर संकट ओढावले होते. पण राज्य सरकारने आता आयपीएलला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

आयपीएल संघांना सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. आयपीएलच्या संघांना दोन सत्रात सराव करता येणार आहे. दुपारी 4 ते संध्याकाळी 6.30 आणि संध्याकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीमध्य मैदानात सराव करायला परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये संघ हॉटेल ते मैदान असा प्रवास करू शकतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा