मुंबई : आयपीएलची तयारी करत असलेल्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईच्या वानखेडे मैदानातील 8 कर्मचार्‍यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने सामने मुंबईबाहेर जाणार?, अशी चर्चा सुरु होती. मात्र या चर्चांना बीसीसीआय अध्यक्षसौरव गांगुलीन पूर्ण विराम दिला आहे.

मुंबईतील नियोजित सामने वानखेडे मैदानावरच पार पडतील, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट करत नाहक चर्चेतील हवा काढून घेतली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंवर कोणताही परिणाम होत नाही. अशा वातावरणात खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे मुंबईत सामने खेळविण्यास तूर्तास तरी कोणताही धोका नाही, असे सौरव गांगुलीने म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मुंबईत सामने खेळविण्यास परवानगी मिळाली आहे. 10 ते 25 एप्रिलदरम्यान मुंबईत केवळ 10 सामने पार पडणार आहे. आमच्याकडे खूपच सुरक्षित सेट आहे जिथे खेळाडू आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहे, तिथे त्यांना कसलाही धोका नाही, असे गांगुली म्हणाला.

एकूण चार संघ आपला सुरुवातीचा सामना मुंबईत खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे सलामीचे सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा