नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे नुकतेच निधन झाले. प्रदीर्घ काळापासून त्या आजारी होत्या. 88 वर्षीय चंद्रा नायडू, भारताचे पहिले कसोटी कर्णधार असलेले सीके नायडू यांच्या मुलगी होत्या. मनोरमागंजमधील घरी चंद्रा यांनी शेवटचा श्वास घेतला. माजी खेळाडू आणि चंद्रा नायडू यांचे नातेवाईक विजय नायडू यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.

चंद्रा या भारताच्या पहिल्या महिला समालोचक होत्या. त्यांनी ’नॅशनल चॅम्पियन्स बॉम्बे’ आणि ’एमसीसी’ या दोन संघांमध्ये 1977 ला खेळवल्या गेलेल्या सामन्यात समालोचन केले होते. समालोचक म्हणून त्या जास्तकाळ सक्रीय राहिल्या नाही. त्यांनी इंदुरमधील शासकीय कन्या महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम केले होते.

1982 मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड संघादरम्यान झालेल्या सुवर्ण जयंती कसोटी सामन्याच्यावेळी एका कार्यक्रमला चंद्रा यांनी संबोधित केले होते. त्यांनी आपल्या वडीलांच्या जीवनावर ’सीके नायडू : ए डॉटर रिमेम्बर्स’ नावाचे पुस्तक देखील लिहिले होते.

माजी क्रिकेटपटू आणि मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संजय जगदाळे यांनी चंद्रा नायडूंच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला. चंद्रा नायडू यांनी मध्य प्रदेश क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले होते, असे जगदाळे म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा