बंगळुरू : आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर देवदत्त पडिक्कल कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे आता तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

हाती आलेल्या वृत्तानुसार, देवदत्तला क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात आरसीबी आपला पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे बलाढ्य मु्ंबईविरुद्धच्या सामन्यात देवदत्तची अनुपस्थिती संघासाठी घातक ठरेल.

गेल्या हंगामात देवदत्तने आयपीएल पदार्पण केले आणि सलामीवीर म्हणून त्याने एक जबरदस्त कामगिरी केली. बीसीसीआयच्या एसओपीनुसार, एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास, त्याला कमीतकमी 10 दिवस वेगळे राहावे लागेल. मागील वर्षी देवदत्तने आरसीबीसाठी भन्नाट कामगिरी केली होती. त्याने 15 सामन्यात 5 अर्धशतकांसह 473 धावा केल्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा