पुणे : दौंड-पुणे-दौंड मार्गावर येत्या गुरूवारपासून मेमू (लोकल) सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे घेण्यात आला आहे. मात्र रेल्वे प्रवासी संघाने या गाडीला विरोध दर्शविला आहे. मेमू ऐवजी या मार्गावर ईमु (विद्युत लोकल) सुरू करण्याची मागणी या ग्रुपने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वे प्रवासी ग्रुपचे सचिव दिलीप होळकर म्हणाले. पुणे-लोणावळा लोकल 44 वर्षे होत आली तेव्हा पुणे-लोणावळा-दौंड-नगर या भागामध्ये विद्युतीकरणाचे काम झाले नव्हते. त्यामुळे पॅसेजरऐवजी मेमु सुरू केली, तर प्रवाशांची वेळ वाचेल. यासाठी मेमूची मागणी करण्यात आली होती. मात्र आता सर्व सुविधा असताना या मार्गावर मेमू न देता ईमू सुरू करावी अशी आमची मागणी असल्याचेही होळकर यांनी सांगितले.
मेमु आता जुनी झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुणे-दौंड-मार्गावर मेमू सुरू करून ती प्रवाशांचा माथी मारू नये. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन प्रवासाच्या वेळेत बचत करण्याच्या दृष्टीने या मार्गावर ईमू सुरू करावी. तसेच या मार्गावर दर अर्ध्या तासाने पुणे-दौंड-पुणे रेल्वे मार्गावर तात्काळ सुरु कराव्यात. या मार्गावर ज्या मेमू गाड्या सुरू करण्यात आल्या. त्याचे डबे मुंबईत वापरले होते. त्यामुळे पुणे-दौंड मार्गावर मेमू सुरू झाली, पण ती जुन्या डब्याने. विशेषत मेमूला वापरण्यात आलेले काही डबे तर अक्षरश: मुंबईतील यार्डात पडून होते. त्यामुळे पुन्हा मेमू सुरू करण्यापेक्षा इमू सुरू करण्यात यावी, अशी मागणीही दिलीप होळकर यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा