चिकनचे दर वाढले; किलोमागे 50 रूपयापर्यंत वाढ
पुणे ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिकन खाणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत कोंबड्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे आठवडाभरात किलोमागे 50 रूपयापर्यंत वाढ झाली आहे. कोंबड्याच्या तुटवड्यामुळे आणखी आठवडाभर दर अधिक असणार असल्याची माहिती व्यापारी रूपेश परदेशी यांनी सोमवारी दिली.
मागील आठवड्यात किरकोळ बाजारात चिकनचा प्रतिकिलोचा दर 200 ते 210 रूपये इतका होता. मात्र सोमवारी हाच दर 250 रूपयांपर्यंत पोहोचला आहे. सुमारे दीड महिन्यांपूर्वी चिकनचे दर मोठ्या प्रमाणात घटले होते. त्यामुळे कुकुटपालनाचा व्यवसाय करणार्‍यांनी कोंबड्यांचे उत्पादन कमी केले होते. त्याचाच परिणाम म्हणून शहरात कोंबड्यांची आवक घटली आहे. त्यातुलनेत मात्र ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात चिकनला मागणी होत असल्याचेही परदेशी यांनी नमुद केले.
पुणे शहरात हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, वेल्हा, बारामती, सातारा आदी भागातून कोंबड्यांची आवक होत असते. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून रोज सुमारे 200 ते 2500 टन चिकनची विक्री होते. मात्र 200 टनापर्यंतच कोंबड्यांची आवक होत आहे. त्यामुळे बर्‍याच वेळा किरकोळ बाजारातील चिकन विक्रेत्यांनी अधिकच्या कोंबड्यांची मागणी करूनही घाऊक बाजारात कोंबड्या उपलब्ध होत नाहीत. याच कारणामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 180 ते 190 रूपये किलोने जिवंत कोंबडीची विक्री सुरू असल्याचेही परदेशी यांनी सांगितले. काही भागात
चौकट
अंडीच्या दरातही वाढ
मागील आठवड्यात अंडीच्या शेकड्याचा दर 410 रूपये होता. मात्र ग्राहकांकडून अंडीलाही चिकनप्रमाणे मागणी वाढली आहे. त्यामुळे शेकड्याच्या दरात 40 रूपयाने वाढ झाली आहे. सोमवारी किरकोळ बाजारात शेकड्याचा दर 450 रूपये होता. कोंबड्याच्या तुलनेत अंडीची आवक चांगली आहे. त्यामुळे अंडीचे दर स्थिर राहतील, असा अंदाजही व्यापारी रूपेश परदेशी यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा