पुणे ः शहरात आठवडाभर मिनी लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर पुन्हा राज्यात 30 एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कापड, सराफी, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक, खेळणी, पूजेचे साहित्य विक्री, फर्निचर विक्रीचे व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यात लॉकडाऊनबाबत नाराजीचा सूर कायम आहे.
मागील वर्षभरात कोरोनामुळे व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन झाल्यास व्यापाराची बसत असलेली घडी स्विकटणार आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासनाने कडक निर्बंध लावावे. त्या निर्णयाच्या बाजूनेच शहरातील व्यापारी असती, मात्र लॉकडाऊन करून प्रशासनाने पुन्हा व्यापार्‍यांना आर्थिक संकटात लोटू नये. अशी भावना विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकार्‍यांनी केली.
मागील शनिवारपासून शहरात सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. हे कडक निर्बंध आठवडाभरासाठी असणार आहेत. त्यासही व्यापार्‍यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महिना अखेरपर्यंत शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार महिना अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे विविध प्रकारचे व्यापारी आणि व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. रात्री उशीरा प्रशासनाने त्याबबतची घोषणा केली नाही. या निर्णयावर व्यापार्‍यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
चौकट
लॉकडाऊनला व्यापार्‍यांचा विरोध
मिनी लॉकडाऊनमुळे विविध प्रकारचे व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात पुन्हा महिनाभर दुकाने बंद ठेवावे लागल्यास त्याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल. दुकाने बंद असल्याने बेरोजगारी वाढेल. दुकानाचे भाडे थकतील. व्यापार्‍यांना तसेच दुकानदारांना कामगारांचे पगार, कर, वीजबिल भरणेही अशक्य होईल. तसेच महिनाभर व्यापार ठप्प झाल्याने व्यापार्‍यांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागेल. त्यामुळे कडक लॉकडाऊनला व्यापार्‍यांचा विरोधच असेल. – महेंद्र पितळिया, सचिव, व्यापारी महामंडळ.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा