उद्धव यांच्या विनंतीनंतर राज यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाउनबाबत चाचपणी सुरू असून, रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेण्यासाठी चर्चा केली. उद्धव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून सरकारला घ्याव्या लागणार्‍या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी कार्यकर्त्यांना सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
उद्धव यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत मनसेने सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. आपण सर्वांनी सरकारी सूचनांचे पालन करावे, सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे, असे ट्विट मनसेने केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा