मियामी : महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने मियामी खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बार्टी आणि कॅनडाची बिआन्का अँड्रेस्कू आमनेसामने आले होते. मात्र, दुखापतीमुळे बिआन्का मागे हटली. त्यामुळे बार्टीला विजेता घोषित करण्यात आले.

जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या बार्टीने पहिला सेट 6-3 असा नावावर केला. दुसर्‍या सेटमध्येही ती 4-0 अशी पुढे होती. मात्र, या सेटदरम्यान बिआन्काला उजव्या पायाला दुखापत झाली.

त्यामुळे तिला रिटायर्ड हर्ट होऊन सामन्यातून बाहेर व्हावे लागले. विजेती झाल्यानंतर बार्टी म्हणाली अँड्रेस्कूबद्दल वाईट वाटते. मला आशा आहे की ती लवकरच ठीक होईल. कोरोनाच्या काळात सध्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू अत्यंत कठोर परिश्रम घेवून आंतरराष्ट्रीय स्पर्धा आप आपल्या देशासाठी जिंकत आहेत.

मात्र अशा स्पर्धांच्या वेळी अनेक खेळाडूंना कोरोना होत आहे. अशा कठीण परिस्थितीत बार्टीने मिळविलेले हे यश कौतूकास्पद आहे. असे तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत तिला आगामी काळासाठी आणि मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करत प्रोत्साहन दिले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा