मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम जवळ आला आहे. येत्या 9 एप्रिलपासून देशातील 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये ही स्पर्धा होईल. कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) 11 एप्रिलपासून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपल्या मोहिमेला प्रारंभ करेल. केकेआरचा मधल्या फळीतील फलंदाज नितीश राणा 22 मार्चला करोना पॉझिटिव्ह आढळला. मात्र, त्यानंतरच्या चाचणीत तो निगेटिव्ह आला आणि आता तो आयपीएलमध्ये खेळण्यास पूर्णपणे तयार आहे. केकेआरकडून अजून एक खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतर आयपीएलसाठी सज्ज झाला आहे.

केकेआरचा नवा खेळा़डू अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग प्रशिक्षणसाठी मैदानात उतरला आहे. बीसीसीआयच्या अनिवार्य 7 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर हरभजनने केकेआरच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला.

केकेआरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हरभजनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भज्जी हॉटेलच्या खोलीतून बाहेर येताना आणि प्रसिद्ध पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये, जेव्हा हरभजन हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडतो, तेव्हा त्याला कारण विचारले जाते. तेव्हा तो माझी चाचणी झाली आहे, आणि आता मी सरावासाठी जात आहे, असे सांगतो. या उत्तरानंतर एक पंजाबी गाणे सुरू होते आणि भज्जी भांगडा करत पुढे जातो.
कोलकाता नाइट रायडर्स : ईऑन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट, गुरकीरत सिंह मान, आंद्रे रसेल, सुनील नरिन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा