मुंबई : शहरातील अमली पदार्थांच्या रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न करणार्‍या अमलीपदार्थ विरोधी कक्षाने शनिवारी मोठी कारवाई केली. कलाकार गौरव दीक्षित याच्या घरातून एनसीबीने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. यापूर्वी अटक करण्यात आलेला अभिनेता एजाज खान याच्याकडे केलेल्या चौकशीतून गौरव दीक्षित याचे नाव समोर आले होते. मिळालेली माहिती अशी की, गौरव दीक्षित याच्या घरातून एमडी, एमडीएमए आणि चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच यावेळी अमली पदार्थ पॅक करण्याचे सामानही त्याच्या घरात आढळून आले. ज्यावेळी एनसीबीने गौरवच्या ंअंधेरीतील लोखंडवाला येथील त्याच्या फ्लॅटवर छापा टाकला त्यावेळी गौरव घरात नव्हता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा