मुंबई ः अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयने स्वत: ट्विट करून कोरोना झाल्याचे सांगितले.
ट्विटमध्ये अक्षयने म्हटले, आज सकाळी मला कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आल्यानंतर स्वतः विलगीकरणात आहे. मी घरीच विलगीकरणात आहे आणि वैद्यकीय मदतही घेत आहे. जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी. लवकरच परत येईन.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने अनेक अभिनेते, अभिनेत्रींना गाठले आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी कोरोनाला पराभूत केले आहे. कोविड संक्रमितांमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, मिलिंद सोमण, आमिर खान, आर माधवन, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया, रमेश तौरानी, बप्पी लाहिरी आणि सतीश कौशिक यांचा समावेश आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा