मुंबई : अँंटिलिया प्रकरणाचा तपास करणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) मुंबई पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर पथक प्रत्येक धागादोरा तपासून पाहात आहे. आता ’एनआयए’ एका रहस्यमय महिलेच्या शोधात आहे, जी वाझे यांच्यासह मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसली होती.

या महिलेच्या शोधासाठी एनआयएने गुरुवारी मुंबईतील मीरा रोड भागातील लक्ष्मी पार्क परिसरातील सेवन इलेवन नावाच्या इमारतीतील एका सदनिकेची तपासणी केली. सीसीटीव्हीमध्ये ही रहस्यमय महिला दिसून येत असून तिच्या हातात पैसे मोजण्याचे मशीन दिसते, जे मशीन मर्सिडीस मोटारीतून जप्त करण्यात आले होेते. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसच्या सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार 4 मार्च रोजी हत्येच्या दिवशी वाझे तिथेच होते. त्या दिवशीच्या जीपीओ आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून सायंकाळी 7 च्या सुमारास वाजे एका वाहनाच्या दिशेने जाताना दिसत आहेत.

पंचतारांकित हॉटेलमधून चालवत होते खंडणीचे रॅकेट

एनआयएने शुक्रवारी माहिती देताना सांगितले की, नरिमन पॉइंट येथील एका पंचतारांकित हॉेटेलमधून सचिन वाझे हे खंडणीचे रॅकेट चालवत होते. हॉटेलमध्ये वाझे नाव बदलून राहात असल्याची माहिती एनआयएच्या तपासात पुढे आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा