बंगळुरु : आयपीएलचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) येत्या 9 एप्रिलपासून सुरू होणार्‍या आयपीएलच्या आगामी 14 व्या मोसमासाठी कालपासून रामचंद्र उच्च शिक्षण व संशोधन संस्था येथे प्रशिक्षण सुरू केले आहे. तर बाकी इतर आयपीएलच्या संघांनीसुद्धा त्यांना देण्यात आलेल्या नियोजित वेळेत आणि वेगवेग़ळ्या नियुक्त करून देण्यात आलेल्या मैदानांवर जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. आयपीएलससाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत.

आरसीबी आपला पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सबरोबर 9 एप्रिल रोजी चेन्नई येथे खेळणार आहे. कर्णधार विराट कोहली आज संघात सामील होण्याची शक्यता आहे.

संघाच्या प्रशिक्षण शिबिरात यजुर्वेंद्र चहल, नवदीप सैनी, सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, अझरुद्दीन, रजत पाटीदार, सचिन बेबी, सुयश प्रभुदेसाई आणि के एस भरत यांचा समावेश आहे. तर, उर्वरित खेळाडू नंतर शिबिरात सामील होतील. आरसीबीच्या म्हणण्यानुसार, हे खेळाडू सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर संघात सामील होतील. क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक माइक हेसन आणि मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच यांच्या मार्गदर्शनाखाली असीबीची नऊ दिवसीय कंडीशनिंग शिबिर चालविण्यात येत आहे. या संघात संजय बांगर, एस. श्रीधरन, अ‍ॅडम ग्रिफिथ, शंकर बासू आणि मलोलन रंगराजन हे प्रशिक्षक कर्मचारी आहेत.

विराटच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी आयपीएलचा 13 वा ‘ठीक’ गेला. चांगली कामगिरी करूनही विराटसेनेने हैदराबादकडून पराभव स्वीकारत प्ले ऑफचा प्रवास थांबवला.

यंदाच्या लिलावात आरसीबीने 35.40 कोटी पैकी 34 कोटी तीन अष्टपैलू खेळाडूंवर खर्च केले. त्यांनी न्यूझीलंडच्या काईल जेम्ससनला 15 कोटी, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला 14.25 आणि ऑस्ट्रेलियाच्या डॅनियल ख्रिश्चनला 4.8 कोटींची बोली लावत संघात घेतले.

आरसीबीची इतर खेळाडूंवर बोली
सचिन बेबी (20 लाख)
रजत पाटीदार (20 लाख)
अझरुद्दीन (20 लाख)
सुयश प्रभुदेसाई (20 लाख)
के. एस. भरत (20 लाख)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा