पुणे : शहरात सात दिवसांसाठी कडक निर्बंध आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असली, तरी अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक तसेच बाहेरगावाहून येणारी प्रवासी यांची गैरसोय टाळण्यासाठी रिक्षा सुरू आहेत. मात्र नेहमीच्या तुलनेत रस्त्यांवर निम्म्याच रिक्षा धावत असल्याचे चित्र आहे.
कडक निर्बंध असले, तरी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील दुकाने आणि बाजारपेठा सुरूच आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, दुकानदार, कामगारांची ये-जा सुरूच असणार आहे. तसेच पुणे हे अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे राज्य आणि देशभरातून या शहरात रेल्वे गाड्या येतात तसेच जातातही. त्यातून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. एसटी बसनेही ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. पीएमपी बस बंद असल्याने या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी शहरात रिक्षा सुरूच असणार असल्याचे रिक्षा संघटनांकडून सांगण्यात आले.
अत्यावश्वक सेवा म्हणून सार्वजनिक वाहतूक सुरू असणे गरजेचे आहे. वाहतूक सेवा बंद ठेवल्यास नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे रेल्वे, एसटी बसने शहरात येणार्‍या प्रवाशांसाठी तिकीट दाखवून रिक्षाने प्रवास करता येईल. तसेच वैद्यकीय सुविधेसाठी रिक्षा उपलब्ध असणार आहेत. सद्य:स्थितीत 50 टक्के रिक्षा रस्त्यांवर आहेत. गरज भासल्यास प्रशासनाने सांगितल्यास आणखी रिक्षा रस्त्यांवर उतरविण्याची रिक्षा पंचायतीची तयारी आहे.- नितीन पवार, निमंत्रक, रिक्षा पंचायत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा