पुणे ः शहर आणि परिसरात दिवसेंदिवस कमाल आणि किमान तपमानात सातत्याने वाढ होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून दिवसभर तीव्र उन्हाच्या झळा, तर सायंकाळी प्रचंड उकाड्याचा सामना पुणेकरांना करावा लागत आहे. शुक्रवारी शहरात 36.6 अंश कमाल, तर 17.5 अंश किमान तपमानाची नोंद झाली.
येत्या दोन दिवसांत पुणे शहर आणि परिसरातील कमाल तपमानात 2 ते 4 अंशाने वाढ होणार आहे. तर किमान तपमानात 1 ते 2 अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. दोन दिवस आकाश निरभ्र असणार आहे. हवामानही कोरडे असेल. त्यानंतर मात्र सोमवार आणि मंगळवारी दिवसभर आकाश निरभ्र असणार आहे. मात्र सायंकाळी आकाश अठशत: ढगाळ असणार असल्याचा अंदाजही पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. वाढलेल्या तीव्र झळांमुळे दुपारी घराबाहेर पडणे अशक्य होत आहे. तर सायंकाळी प्रचंड उकाड्याने घरात बसणे अशक्य होत असल्याचे चित्र शहरात आहे. वाढलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिकांना फॅन, कुलर, एसीचा वापर करावा लागत आहे.
दरम्यान, राज्यात मागील 24 तासात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. कोकण, गोव्यात तुरळक वाढ झाली. मराठवाड्यात कमाल तपमान सरासरीच्या जवळपास होते. शनिवार पासून पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा